Monday, April 6, 2026
HomeTop Newsघरगुती वीज तोडल्याने जावली तालुक्यात वायरमनला मारहाण ;

घरगुती वीज तोडल्याने जावली तालुक्यात वायरमनला मारहाण ;

वीज कनेक्शन तोडणार्या वायरमनला  मारहाण ;जावली तालुक्यातील घटना

सूर्यकांत जोशी कुडाळ – घराचे विज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून वीजवितरण कंपनीच्या वायरमनला शिवीगाळ करत दगडाने व हाताने मारहाण करून  मोटरसायकल चे नुकसान केले असल्याची घटना जावली तालुक्यातील मामुर्डी या गावात घडली. याबाबत  महादेव लक्ष्मण शेलार 43 वर्षे व्यवसाय नोकरी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण (वायरमन) रा. वागदरे तालुका जावली यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शिवाजी श्रीरंग धनावडे 

रा. मामुर्डी  तालुका जावली यांच्या वर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड करत आहेत.

         दरम्यान वीजवितरण कंपनीने सध्या लोकांची परिस्थिती ध्यानात घेऊन सबुरीने घेणे आवश्यक आहे. वीजवितरण ची सध्याची थकबाकी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या वीजबील माफीच्या आश्वासनामुळे आहे.यापूर्वी सर्वसामान्य ग्राहकाने वीज बील वेळेवर भरून वीजवितरण ला सहकार्य केले आहे.सध्या कोरोना मुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत आहे. कुटुंब कसे जगवायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. अशावेळी लोकभावनेचा उद्रेक झाल्यास त्याचे अशापद्धतीने गंभीर पडसाद उमटतील अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page