Thursday, February 19, 2026
HomeTop Newsचंद्रकांत ओंबळे यांचा संस्थापक सहकार पॅनेलला जाहिर पाठिंबा.

चंद्रकांत ओंबळे यांचा संस्थापक सहकार पॅनेलला जाहिर पाठिंबा.

प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूक


कुडाळ – प्रतापगड सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मी बाहेरगांवी असल्याने महाबळेश्वर ऊस उत्पादक गट क्र. ५ या गटामध्ये माझा उमेदवारी अर्ज निवडणूक . प्रक्रियेत शिल्लक राहीला आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. या विचाराशी मी सहमत होतो. आज कारखाना बंद स्थीतीत असताना सर्व सभासदांना मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे . मी माझा पाठींबा संस्थापक पॅनेलला जाहीर करीत असून मतदारांनी संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन चंद्रकांत विठोबा ओंबळे यांनी केले आहे.
मेढा येथे झालेल्या बैठकिमध्ये त्यांनी आपला पाठींबा व्यक्त केला असून यावेळी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. शिवाजीराव म मर्ढेकर माजी उपसभापती कांतीबाई देशमुख पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पार्टे, उमेदवार आनंदराव जुनघरे ,दिलीप वांगडे, बाळकृष्ण निकम त्याचप्रमाणे संतोष वारागडे, बाळासाहेब ओंबळे ,मारुती जुनघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page