Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजनसंघाचे जेष्ठ नेते मधुकर पवार यांचे निधन

जनसंघाचे जेष्ठ नेते मधुकर पवार यांचे निधन

सातारा जिल्ल्यातील जनसंघाचे जेष्ठ नेते मधुकर पवार यांचे निधन                       कुडाळ दि : आनेवाडी ता जावळी गावचे सुपुत्र व जनसंघाचे जेष्ठ नेते मधुकर शिवाजी पवार तथा मधुकर सरस्वती यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी पुणे येथे पहाटे निधन झाले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात त्यांनी  निवडणूक लढवून जनसंघाच्या  आदेश मानला होता. 

लहानपणापासून काँग्रेस विरोधी विचार सरणी असल्याने ते जनसंघाचे समर्थक बनले होते. शिक्षकी पेशा सोडून ते तत्वनिष्ठ राजकारणाशी जोडले गेले होते. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, गिरीश बापट, माधव भंडारी, गजाभाऊ कुलकर्णी, डॉ हर्षे यांच्या सारख्या जनसंघाच्या नेत्यांशी त्यांचा परिचय होता.

 जनसंध्यापासून त्यांनी पक्ष वाढी साठी प्रयत्न केले होते. भूविकास बँक विरोधात उपोषण केले तेव्हा स्वतः साथी एस एम जोशी यांच्या हस्ते उपोषण सोडले होते. वसंतदादा पाटील, भि दा भिलारे यांच्या सारख्या स्वातंत्रसैनिक असलेल्या व्यक्ती विरोधात जनसंघाच्या आदेशाने त्यांनी निवडणूक लढवली होती. १९९५ साली जावळी विधानसभा मतदारसंघात सेना-भाजप युतीचे आमदार सदाशिव सपकाळ यांना निवडून देण्यासाठी त्यांनी प्रचार यंत्रणेत सहभाग घेतला होता.                                                आनेवाडी येथील त्रिमूर्ती म्हणून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंगराव फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव शिंदे व भाजपचे मधुकर पवार हे राज्यात ओळखले जात होते. आज तिघे ही हयातीत नाहीत. दिवंगत पवार यांच्या मागे त्याचा विवाहित मुलगा, मुली,सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्याकाळी त्यांनी अंतर जातीय विवाह करून जात पात तोडो चा कृतीतून नारा दिला होता.  शरीरसौष्ठव स्पर्धा  राष्ट्रीय पंच चंदू पवार यांचे वडील होत. अनेक पक्ष नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच दलित सेना सरचिटणीस प्रेमानंद जगताप, मुरलीधर शिंदे, महात्मा फुले युवा संघटनेचे ऍड धनंजय फरांदे यांनी मधुकर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.सातारा जिल्ह्यातील मर्ढे येथील कृष्णा नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page