
कुडाळ – गेल्या दहा वर्षात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कुडाळ सह संपूर्ण गटात विविध प्रकारची विकास कामे मोठया प्रमाणात करण्यात आली आहेत. देशात व राज्यात भाजपचे सरकार असून स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा भाजपाच्या विचाराच्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुडाळ ग्रामस्थ विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कुडाळ जि. प. गटाचे अधिकृत उमेदवार जयश्री सुहास गिरी व पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौरभ राजेंद्र शिंदे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी सभापती सुहास गिरी यांनी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुडाळ येथे जयश्री गिरी व सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यात येत आहे. या दोन्ही उमेदवारांच्या सोबत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळामध्ये गिरी दांपत्याच्या माध्यमातून पंचायत समितीचे सभापती पद सांभाळत असताना सर्वसामान्य जनतेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.त्याचबरोबर प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी सुद्धा अल्पवयात आपले आजोबा आणि वडील यांच्या पश्च्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपले योगदान दिले आहे.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कुडाळ गटात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले आहेत व सध्या सुरू आहेत या पुढील काळात सुद्धा गटातील नियोजनबद्ध विकासासाठी जयश्री गिरी व सौरभ शिंदे कटिबद्ध राहतील असा विश्वास धनंजय केंजळे यांनी व्यक्त केला.