कुडाळ – एका सहा वर्षीय मुलीला खाऊचे आमीष देऊन व अश्लील व्हिडिओ दाखवून सहा जणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद मेंढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.याप्रकरणी केडांबे या.जावली येथील सहापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.याघटनेने जावली तालुक्यात खळबळ माजली आहे.
या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून १)अनिकेत उर्फ कृष्णा रामचंद्र ऊर्फ रामजी सुतार 2) रामचंद्र ऊर्फ रामजी कोंडीबा ऊर्फ बबन सुतार 3) सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा 4) लक्ष्मण कोंडीबा ऊर्फ बबन सुतार (माईचे दादा) 5) रवींद्र विश्वनाथ ओंबळे 6) निखिल उर्फ अनिकेत राजू ओंबळे, सर्व राहणार केडांबे, ता. जावली जिल्हा सातारा यांच्यावर मेंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दोन ते सहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यातील आरोपी १८ ते ६२ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एप्रिल मे 2020 पासून ते तारीख 17/03/2021 रोजीचे सायं.05.30 वा. चे सुमारास पर्यंत वेळोवेळी आरोपी नं. 1 याचे रहाते घरातील माळ्यावर,. आरोपी नं. 2 याचे शेतात असले वैरणीचे गंजी जवळील झोपडीत,. आरोपी नं. 3 याचे राहते घरात, आरोपी नं.4 याने त्याचे रात्री घरातील खोलीत, आरोपी नं.5 याने आरोपी नं. 6 याचे राहते घरात बेडवर सदर अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे खबरीत नमूद केले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी शितल खराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करत आहेत.
