Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज एक कोरोना बळीची नोंद ; एकूण कोरोना बाधित १६०२...

जावली तालुक्यात आज एक कोरोना बळीची नोंद ; एकूण कोरोना बाधित १६०२ , बळी ४३

; १४ जण कोरोना पाँझिटीव्ह ; ६२ डिस्चार्ज

एकूण – १६०२ , डिस्चार्ज १२३१, बळी ४३ ,अँक्टिव्ह ३२८

 सूर्यकांत जोशी  कुडाळ – जावली तालुक्यात आज ओझरे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यूची नोंद  झाली आहे. तालुक्यात एकूण कोरोना बळींची संख्या ४३ वर पोहचली आहे. आज अँन्टीजेन टेस्ट मध्ये १४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये निझरे 2,गांजे  2,

कुसुंबी १,भुतेघर मुरा  ६,मार्ली २, म्हाते खूर्द १ यांचा समावेश आहे. आज  लँबचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

मेढा कोविड सेंटर मुळे रुग्णांना दिलासा      

मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटर मध्ये १५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.तसेच सहा दिवसात आठ  कोरोना बाधित बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. एकूणच मेढा ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर मुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची उपचाराची सोय झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना  दिलासा मिळत आहे.

जावली कोविड इमरजन्सी वाँटसपग्रुप चा रुग्णांना आधार

       जावली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. अशा प्रसंगी कोरोना बाधितांना योग्य मार्गदर्शन व वैद्यकीय मदत मिळवुन देण्यासाठी जावली कोविड इमरजन्सी ग्रुपचा रुग्णांना आधार मिळत आहे.

        या ग्रुपच्या अँडमिन व हिरकणी फाउंडेशन च्या संस्थापिका जयश्री शेलार तसेच या ग्रुपवर असलेले सामाजिक कार्यकर्ते रुग्णांना आवश्यकतेनुसार हाँस्पिटल,बेड, आँक्सिजन, औषधे मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. तसेच आवश्यक ते सहकार्य करत आहेत. याग्रुपच्या संकल्पने तुन कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी  लोकसहभागाची चळवळ सुरु झाली. आणि यातूनच अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे.

         येऊ घातलेल्या संकटाची भीषणता लोकांच्या ध्यानात आल्याने आता गावपातळीवर आवश्यक प्राथमिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. कुडाळ येथे लोकसहभागातून आठ बेडचे इमर्जन्सी केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे.तर सावली ग्रायस्थांनी केळघर प्राथमिक आरोग्य केद्रासाठी चार बेड भेट दिले, अनेक देणगीदारांनी कोविड सेंटरला आँक्सिजन मशीन, वाँटर प्युरीपायर या सारख्या अत्यावश्यक वस्तू भेट स्वरुपात दिल्या. तर कोणी रोख स्वरूपात मदत केली आहे. या प्रमाणेच आता गावपातळीवर आँक्सिजन मशीन सारख्या सुविधा लोकसहभागातून उपलब्ध केल्या जात आहेत. राजकारण, हेवेदावे, मतभेद,मानमरातब विसरुन कोरोना च्या या संकटात माणसातील माणूसपण जागे झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page