Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा ; २२८ जण कोरोना मुक्त,१०२ जण कोरोना...

जावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा ; २२८ जण कोरोना मुक्त,१०२ जण कोरोना बाधित

जावली तालुक्यात आज बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोना मुक्त ;आज १०२  बाधित तर २२८ जण कोरोना मुक्त :

एप्रिल महिन्यातील आणखी १५ मृत्यूंची नोंद, एकूण मृतांचा आकडा १०६ वर;

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील जनतेने दाखवलेला संयम आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परते मुळे तालुक्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे समाधान कारक चित्र आजच्या अहवालात दिसून येत आहे.

           दि. २३ व २४ रोजी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत १०२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.या बरोबरच आज तब्बल २२८ जण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी गेले आहेत.दरम्यान तालुक्यातील बाहेर उपचार घेत असलेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मुळे झालेल्या १५ मृत्यूंची नोंद आज रेकॉर्डवर आली आहे.त्यामुळे तालुक्यातील एकूण मृत्यू चार आकडा १०६ वर पोहचला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

          आजच्या अहवालात कोरोना बाधित ; पावशेवाडी ३, तेटली१,आंबेघर त.मेढा ४,बिभवी २, बोंडारवाडी २,गवडी २, जवळवाडी २,केडंबे १,केळकर १,मेंढा १२,मुकवली १, नांदगणे १,ओझरे ३,पुनवडी २,रेंडीमुरा १,रिटकवली ३,सावली १, बामणोली त.कुडाळ ६,दापवडी १,हुमगांव २,करहर १, कुडाळ १०,पानस १,रुईघर १, विवर ३, शेते १,सोमर्डी १,दुंद १,गाळदेव २,म्हाते बु.१,पिंपरी त. मेढा ४,सांगवी २,तांबी १,आलेवाडी१,दरे बु.४,दुदुस्करवाडी १, इंदवली २,खर्शी त.कुडाळ १,महामुलकरवाडी २, महिगाव १, नरफदेव १,रायगांव १,सर्जापूर १,सरताळे ३, सायगांव २.

     जावलीतील जनतेने अजूनही संयम दाखवला पाहिजे.तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच नियमांचे पालन करुन कोरोना संसर्गापासून स्वतः चा  बचाव करावा असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page