Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोना बाधितां पेक्षा मुक्तीच अधिक दिलासादायक ;

जावली तालुक्यात आज कोरोना बाधितां पेक्षा मुक्तीच अधिक दिलासादायक ;

सूर्यकांत जोशी कुडाळ -.  जावली तालुक्यात कोरोनाची आता उलटी गिनती सुरू असल्याचे चित्र या आठवड्यात दिसत आहे.तरीसुद्धा जावलीकरांना हा संयम यापुढेही दाखवावा लागणार आहे . तालुक्यात अजुनही ६२२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.जो पर्यंत या सर्व रुग्णांचा विलगिकरण कालावधी पूर्ण होत नाही.तसेच पूर्ण बरे होत नाहीत.तो पर्यंत रुग्ण,त्यांचे नातेवाईक यांनी संसर्ग साखळी वाढणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.त्याच बरोबर सर्वांनी नियमांचे पालन करुन कोरोनाला लवकर हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

       जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी ५१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ऐंशी जणांनी कोरोनावर मात केली आहे.

               आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;बाहुले १, भणंग १,केळघर ४,मरडमुरे १,मेढा ४,पुनवडी २, सावली १,घोटेघर १,हातगेघर १,हुमगांव २, करहर १, खर्शीबारामुरे १,कोलेवाडी १, कुडाळ २,रांजणी १,शेते १,सोमर्डी १, कुसुंबी २,आलेवाडी ५,आनेवाडी ३,बेलावडे २, भिवंडी १, इंदवली त.कुडाळ ६, करंदी त.कुडाळ १,मोरघर १, सर्जापूर २, सोनगाव २ एकूण ५१.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page