निष्काळजीपणा देतोय कोरोनाला निमंत्रण.
एकूण ; बाधित ७२७३, डिस्चार्ज ६३६९, मृत्यू १८५, अॅक्टिव्ह ७१९
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गेल्या आठदिवसांत कोरोना बाधितांची वाढ मंदावली होती.कोरोना मुक्तीचा दिलासा मिळेल असे वाटत असतानाच आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोना बाधितांना ते दुप्पट वाढ झाली.लोकांचा थोडासा निष्काळजीपणा कोरोनाच्या समूह संसर्गाला निमंत्रण देत असल्याचे आजच्या अहवालात स्पष्ट होत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२० रोजी घेतलेल्या स्वाब व दि.२१ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ९७. जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तालुक्याची अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ७१९ झाली आहे.कोरोना बाधितांकडुन होम आयसोलेशन व्यवस्थित पाळले जात नसल्याने संसर्ग साखळी तयार होत असल्याचे दिसून येत असल्याने यापुढे लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्रामआयसोलेशन तसेच लक्षणे असलेल्या बाधितांना कोरोना केअर सेंटर मध्ये ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
दि. २० व २१ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्णांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;तेटली ५,आंबेघर तर्फे मेढा २,भूतेघर २,भिवडी १,डांगरेघर १, जवळवाडी ४,केळघर ५,मेढा ८,ओखवडी १, पुनवडी १,वाळंजवाडी २७,दापवडी १,हुमगांव ९,कुडाळ २,पार्टेवाडी ५,सायघर २,सोमर्डी ५,कुसुंबी ५,मोहाट १,आनेवाडी २,बेलावडे १, करंदी त.कुडाळ १,मोरघर १,पवारवाडी २,सायगांव २ एकूण ९७.