सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्यांत मोठी घट झाली असल्याने दिलासा मिळाला आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. २७ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ४१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १११ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.अॅक्टीव्ह रुग्ण ५४४ राहिले आहेत.यामध्ये गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;बाहुले १,बिभवी १,मेढा ४,घोटेघर १, इंदवली १, खर्शीबारामुरे १, कुडाळ २,महू २,ओखवडी १,पार्टेवाडी ९, सोमर्डी ३,निजले १,आलेवाडी २,आनेवाडी ४,बेलावडे १,भिवंडी १,दरे २, इंदवली १,करंदोशी १, रानगेघर १, सरताळे १. एकूण ४१.