Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा शंभरी पार ;११ मृत्यूंची नोंद:...

जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा शंभरी पार ;११ मृत्यूंची नोंद: ९३ जणांची कोरोनावर मात

एकूण ;बाधित ६७२८, डिस्चार्ज ५७२९, मृत्यू १६७, अॅक्टिव्ह ८३१

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या आकडा आज पुन्हा शंभरी पार गेला आहे.एप्रिल व मे महिन्यातील आणखी अकरा मृत्यूंची आज नोंद झाली आहे.तर ९३ जण कोरोना वर मात करुन सुखरूप घरी गेले आहे.

     जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१३ रोजी घेतलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तब्बल १०५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये कास ७,शेंबडी २, गवडी १,केडंबे ४,केंजळ २,करंदोशी २,मेढा ४,ओझरे ३, रेंडिमुरा १, सावली ६,दापवडी १,घोटेघर १०,हातगेघर १,हुमगांव १, खर्शीबारामुरे १, कुडाळ ११,महू १,म्हसवे १,पिंपळी २,रुईघर १,सायघर ५,शेते १,सोमर्डी १,गांजे ३,कुसुंबी ३, मालचौंडी १,आलेवाडी १,आनेवाडी ४,बेलावडे १,भिवडी २,दुदुस्करवाडी १, इंदवली १, प्रभूचीवाडी १, सर्जापूर १,सरताळे २, सोनगाव २,येरुणकरवाडी १ यांचा समावेश आहे.तसेच भिवडी,सोमर्डी,घोटेघर,मेढा,फळणी येथील प्रत्येकी एक यासह एकूण अकरा मृत्यूंची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page