Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा देणारा अहवाल;

जावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा देणारा अहवाल;

जावली तालुक्यात आज कोरोनाचा दिलासा देणारा अहवाल ;

एकूण ; बाधित.  ६८०४, डिस्चार्ज. ५८०७, अॅक्टिव्ह. ८१८, मृत्यू १७९

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या दोन महिन्यांत जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांचा आकडा प्रथमच सत्तरच्या आत आला आहे.जावलीतील लोकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोनाला लवकर हरवणे शक्य आहे.

         जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज ७६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. यामध्ये एप्रिल व मे महिन्यातील सात मृत्यूंच्या नोंदीचा समावेश आहे.याशिवाय अन्य चार अशा एकूण ११ मृत्यूंची नोंद झाली आहे .आज ७९ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

           दि.१३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१४ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेले गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;कास १,तेटली ९,वाघळी २, आगलावेवाडी १,आंबेघर तर्फे मेढा ३,बिभवी ३,डांगरेघर १, जवळवाडी १,करंदोशी १,मेढा ७,रेंडीमुरा २,रिटकवली १,दापवडी १,घोटेघर ६ पैकी एक मृत्यू दि.४ मे., आखाडे १ मृत्यू दि.२५/४/२१, खर्शीबारामुरे ४,कोलेवाडी १, कुडाळ ४,महू दोन मृत्यू दि.३ व ४ मे, म्हसवे १, सोमर्डी ३ मृत्यू दि.८ व २९ एप्रिल आणि ६ मे,कुसुंबी ५ ,आनेवाडी १, भिवडी ४,करंदी त.कुडाळ १,मेरुलिंग १, प्रभूचीवाडी २,सायगांव १, सरताळे ६.

        गेले पंधरा दिवस कडक लाॅकडाऊन मध्ये जिल्ह्यातील किराणा व भाजीपाला दुकाने बंद आहेत . अजुनही पंधरा दिवस पूर्ण लाॅकडाऊन केले आहे.असे असले तरीही जिल्ह्यातील कोरोना बाधितांना आकडा दररोज दोन हजार पार करत आहे.एक महिन्याचे किराणा सामान भरणारा वर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढाच आहे.पण रोजच्या रोज किराणा घेऊन पोट भरणाराची संख्या ही मोठी आहे.याचा विचार होणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page