Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ११३ जण कोरोना मुक्त;८० जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

जावली तालुक्यात आज ११३ जण कोरोना मुक्त;८० जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरत आहे.परंतू होम आयसोलेशन व्यवस्थित  पाळले जात नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या नजिकच्या संपर्कातील लोक संक्रमित होत आहेत.सर्वांनी योग्य काळजी घेतली तर कोरोना लवकरच हद्दपार होऊ शकणार आहे.

      जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आज तब्बल ११३ जण कोरोना मुक्त झाले आहेत.आज कोरोना मृत्यूची नोंद नाही.दि.१० रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.११ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ऐंशी जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये धेन ३,बिभवी १,बोंडारवाडी १,गवडी २, जवळवाडी २,मामुर्डी १, मेढा १२,ओझरे १, रिटकवली २, सावली ४,तळोशी ३, कुडाळ ६,पानस १,पिंपळी ५, रांजणी २,रुईघर ३,सायघर २, सोमर्डी १, वालुथ ३,गाळदेव १,कुटुंबीय १,मालचौंडी १,म्हाते बु. १, पिंपरी तर्फे मेढा १,आर्डे १,बेलावडे २,भिवडी ४, इंदवली २,करंदी त.कुडाळ २,करंदोशी ३,नरफदेव १, सर्जापूर १,सरताळे ३ एकूण ८०.यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page