Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज १३० डिस्चार्ज ;७३ पॉझिटिव्ह,६ मृत्यू

जावली तालुक्यात आज १३० डिस्चार्ज ;७३ पॉझिटिव्ह,६ मृत्यू

जावली तालुक्यात आज १३० डिस्चार्ज,७३ बाधित,६ मृत्यूची नोंद

एकूण – बाधित ५१४५, डिस्चार्ज ३९९४, मृत्यू १२०, अॅक्टिव्ह १०३१

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे.बाधितांच्या व डिस्चार्ज च्या आकडेवारीत मोठे चढ-उतार होत आहेत. दि. २६ रोजी घेण्यात आलेल्या स्वाबमध्ये  तालुक्यात ७३ जण कोरोना बाधित झाले आहेत.तर १३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोना मुळे झालेल्या सहा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा १२० वर पोहचला आहे. आज कोरोनबाधितांपेक्षा डिस्चार्ज ची संख्या जास्त आहे.परंतू दररोज मृत्यूंची वाढणारी आकडेवारी सुद्धा काळ्जी करायला लावणारी आहे.

          जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार  दि.२६.  रोजी घेण्यात आलेल्या स्वाब मध्ये कोरोना बाधित आकडेवारी पुढील प्रमाणे – बामणोली क.२,आंबेघर तर्फे मेढा २,आसणी ३,बहुले १,भूतेघर १,बिभवी ७, जवळवाडी ३,केळघर३,मामुर्डी २,ओझरे ३,सावली १,आंबेघर तर.कुडाळ १,भोगवली २, कुडाळ ३,शेते ७,सोमर्डी ३, दुंद १,कुसुंबी २,म्हाते बु.१,मोहाट ६,पाटणेमाची १,पिंपरी त.मेढा १,आलेवाडी १, भिवंडी २,दरे बु.७, महिगांव ४, सर्जापूर १.एकूण ७३.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page