कुडाळ दि.२३. जावली तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे.जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. २२ रोजी रात्री २२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.
यामध्ये कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे भणंग २,घोटेघर १,आखाडे १, कुडाळ ५,करहर ९,शेते १,आनेवाडी १,सरताळे २, एकूण २२. तालुक्यात सध्या १४१ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.