Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ६४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावली तालुक्यात आज ६४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

एकूण -१३३४,डिस्चार्ज ९५८, बळी ३५ , अँक्टिव्ह २४५

 सूर्यकांत जोशी कुडाळ   जावली तालुक्यात आज ६४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या मध्ये भणंग  15,सावली 7,मेढा 7,

वालुथ 6,सर्जापूर 4,करंदी त. कुडाळ  3,सोनगाव 3, आंबेघर त. मेढा 2,पवारवाडी 2,हुमगांव 1,कुडाळ 1,मोरघर 1,  र: जवळवाडी 1,करंजे 4,भणंग 2,
मेढा 3, कुडाळ 1

यांघा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

 मेढा ग्रामीण रुग्णालयांतर्गत कोविड सेंटर सोमवार पासून सुरू होणार

             शासनाच्या आदेशानुसार  मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आँक्सिजन सुविधेसह तीस  बेडचे कोविड सेंटरचे काम पूर्ण झाले आहे.  आज प्रातिनिधिक स्वरुपात दहा बेडची सुविधा सुरू करण्यात आली आहे.   सोमवार पासून हे सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.

 तालुक्यात वेळेवर अँम्ब्युलन्स मिळत नसल्याने खाजगी वाहनांचा वापर 

      कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात नेहण्यासाठी अँम्ब्युलन्स ची वानवा असून जीव धोक्यात घालून खाजगी वाहनांचा वापर होत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका संभवत आहे.याबाबतीत अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

              तालुक्यात सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ५ तसेच १०८  नंबरच्या ४ व खाजगी दोन अशा एकूण ११ अँम्ब्युलन्स उपलब्ध असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.  

कमावलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हीच योग्य वेळ

 हयातभर कष्ट करत असताना त्यातून भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी तसेच अडिअडणीच्या प्रसंगी उपयोग व्हावा यासाठी सुजाण लोक बचत करत असतात. कमवून ठेवलेले धन संपत्ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी वापरण्याची हीच योग्य वेळ आहे. गेले सहा महिने अनेक व्यवसाय ठप्प आहेत. अनेकांना रोजगार नाही अशी स्थिती आहे. परंतु ज्यांनी आजपर्यंत कमावुन शिल्लक राखलेले आहे .किमान त्यांनी तरी या परिस्थितीत जीव धोक्यात घालून कमावण्याची आवश्यकता नाही.आताच्या परिस्थितीत आता फक्त आपल्या घरातच कुटुंबियांसह सुरक्षित राहू शकणार आहोत. हे ध्यानात घेऊन अती तातडीच्या कारणा शिवाय घरातून बाहेर पडणे हितावह नाही. ‘सर सलामत तो , पगडी पचास ‘   या म्हणी प्रमाणे या संकटातून सहीसलामत जगलो वाचलो तर अजूनही भरपूर कमावता येईल. पण कमावलेल धन आता उपयोगात न आणून जीव धोक्यात घातला तर कमावलेले सर्व मातीमोल होईल.शेवटी अंत्य विधीला सुद्धा आपल्या जवळच्या अगदी घरच्यांना सुद्धा उपस्थित राहता येत नाही.

               आज कोरोनाने एवढे विक्राळ रुप धारण केले असताना विशेषतः युवापिढी आम्हाला काही होत नाही असे म्हणून बिनधास्त आहे. परंतू शारिरीक तंदुरुस्ती मुळे कदाचित कोरोनाची लक्षणे दिसून येणार नाहीत. परंतू आपल्या चूकीमुळे घरातील तसेच समाजातील लहानमुले, महिला, वयोवृद्धव्यक्ती व अशक्त आजारी कोरोना बाधित रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही  याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

                      कोरोना बाबत समाजातील भीती आणि गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. कोरोना होणे म्हणजे अपराधी वाटणे किंवा समाजात कमी पणाचे वाटून घेणे चुकीचे आहे. इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच हा आजार आहे.फक्त याचा संसर्ग इतर आजारांच्या तुलनेत जास्त वेगाने होत आहे.या आजाराचे वेळीच निदान करुन उपचार घेतले तर यातून सहीसलामत बाहेर पडता येते. तर वेळीच स्वतःला अलगीकरण करुन घेतले तर संभाव्य संसर्गापासून आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला वाचवू शकतो.हा आजार होणे म्हणजे अपराध मुळीच नाही. अनवधानाने हा संसर्ग कोणालाही होऊ शकतो.यातुन रथी महारथी सुद्धा सुटले नाहीत. उलट अनेक मान्यवर आपण कोरोना बाधित असल्याचे जाहीर पणे सांगत आहेत. हाच मनाचा मोठेपणा समाज हितासाठी सर्वसामान्य जनतेही दाखवण्याची आवश्यकता आहे.

                 परंतू आजही अज्ञान म्हणून किंवा कोरोनाची व समाजाची भिती म्हणून अनेकजण लक्षणे असूनही कोरोना टेस्ट करण्यासाठी नकार देत असल्याचे पण पहायला मिळते.आणि यामुळे संसर्ग ही वाढत आहे. आणि रुग्ण अत्यावस्थ झाल्यावर बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.आँक्सिजन, व्हेन्टिलेटर व बेड उपलब्ध न झाल्याने तडफडून आपल्याच स्वकियांचे प्राण जात आहेत. त्यामुळे आतातरी सावध व्हा आणि सुरक्षित रहा काळजी घ्या असेच आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.

            मुळातच कोरोना पासून स्वतः चे कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने कोरोना तपासणी करुन औषधोपचार घेणे आवश्यक आहे. वेळ टळुन गेल्यावर पैसा, संपत्ती ,पद प्रतिष्ठा कोणालाही कोरोना पासून वाचवू शकणार नाही.

                     समाजाला कोरोना पासून वाचवण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग गेले सहामहिने जीव धोक्यात घालून काम करत आहे. यामध्ये खाजगी रुग्णालये तसेच डाँक्टर मोठे योगदान देत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संघटना आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. अशावेळी लोकांनी सुद्धा परिस्थितीची जाणीव ठेवून योगदान देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page