सूर्यकांत जोशी कुडाळ ; गेल्या आठवड्यात कोरोना बाधितांचा वेग मंदावला होता.परंतू या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आता कोरोनाची लहान मुलांकडे वक्रदृष्टी पडली असल्याने काळजी वाढली आहे.कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.आजच्या अहवालात तालुक्यात दहा वर्षांच्या आतील आठ मुलांचा समावेश आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
नेवेकरवाडीत कोरोनाचा हाहाकार
जेमतेम चारशे च्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या नेवेकरवाडीत गेल्या आठ दिवसांत ३०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये तब्बल ८५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये दहा वर्षांच्या आतील तेरा लहान मुलांचा समावेश आहे.
जावलीच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेवेकरवाडीत घराघरात सर्व्हे सुरू आहे.कोरोना बाधितांची संख्या जास्त असली तरीही सर्वांची प्रकृती ठीक आहे.दाट लोकवस्ती आणि सध्या शेतीच्या कामासाठी एकत्रित येण्यामुळे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.येथील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावली तालुक्यात दि.१५ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१६ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ५३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये नेवेकरवाडी येथील २६ जणांचा समावेश आहे.आज २२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे . आज अखेर २२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात २७७ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.
आजच्या अहवालात हुमगांव येथील एक वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.तसेच नेवेकरवाडी येथील दहा वर्षांच्या आतील सात बालकांचा समावेश आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; सावरी १, सावली ३,दापवडी १,हुमगांव ३,खर्शी तर.कुडाळ ३,महू १,पिंपळी १,रांजणी २,शेते १, सोमर्डी १,वागदरे १,भिवडी १, मार्ली ६,नेवेकरवाडी २६,रानगेघर १, सांगवी (सोनगाव) १.एकूण ५३.