जावली तालुक्यात आज ५० कोरोना बाधितांची वाढ
एकूण – ८१८, बळी २१, डिस्चार्ज ६०६ ,अँक्टिव्ह १९१
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तब्बल ५० कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. यामध्ये मेढा येथील सोमवारी रात्री उशीरा आलेले तसेच आज आलेले स्वाबचे अहवाल व आज घेण्यात आलेले अँन्टीजेन मिळून तब्बल ३३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच भोगावली तर्फे कुडाळ ५,भिवडी 3, भणंग२,आंबेघर तर्फ मेढा २,बिभवी ५ अशा आज एकूण पन्नास जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांना १४ दिवस क्वारंटाईनचा नियम अजूनही कायम
दरम्यान आता ग्रामीण भागात स्थानिक कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या रुग्णांना कोठून संसर्ग झाला हे समजत नाही.त्यामुळे ग्रामीण भागात सामाजिक संसर्ग होत आहे. गेल्या चार महिन्यात मुंबई ,पुणे तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. परंतु त्याच्या दहापट आता स्थानिक संसर्ग वाढत आहे . महाराष्ट्र शासनाने एक सप्टेंबर पासून ई पास ची सक्ती रद्द केल्या मुळे आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांना पूर्वी प्रमाणे गावात संस्थात्मक किंवा होमक्वारंटाईन ठेवायचे का याबाबत संभ्रम असल्याने अनेकांनी पत्रकारांशी याबाबत संवाद साधून विचारणा केली.
. याबाबत तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या कडे विचारणा केली असता शासनाने फक्त ई पास बंद केले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांना होमक्वारंटाईनचे नियम व अन्य निर्बंध रद्द केलेले नाहीत.त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांना पूर्वी प्रमाणेच क्वारंटाईन ठेवावे लागेल असे स्पष्ट केले आहे.
जावली तालुक्यातील तीन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ,बिभवी, मेढा येथील प्रभाग क्र. ११, ८ या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील तीन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
