एकूण – १९९१, डिस्चार्ज १८१५, बळी ५४ ,अँक्टिव्ह ११३
सूर्यकांत जोशी कुडाळ – तालुक्यात आज अकरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये म्हाते खु 5,मालचोन्डि 4,गांजे 1,करहर 1 यांचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावली तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सात महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा आता दोन हजारांच्या उंबरठ्यावर आला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा १९९१ वर पोहचला आहे तर १८१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सात महिन्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रयत्न परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.परंतु निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहुन आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या सह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुढे सरसावले, कोविड सेंटर, आँक्सिजन मशीन यासह सुविधा निर्माण करण्यात आल्या. कोरोनाची दाहकता सप्टेंबर मध्ये जावलीतील जनतेने अनुभवली.
मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. तालुक्यातील कोरोना अपडेट्स लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे न्यूज पोर्टल अल्पावधीतच लोकप्रिय झाले. दररोज रात्रीच्या येणाऱ्या कोरोना अहवालांची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात असतात. अनेक जणांनी या सुविधे बाबत समाधान व्यक्त केले. जावलीतील जनतेच्या प्रेम आणि विश्वासामुळे आजही हे न्यूज पोर्टल महत्वाची भूमिका बजावत असून यापुढेही लोकांच्या विविध समस्यां बाबत नक्कीच जनतेचा आवाज बनून कार्यरत राहील.