Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बरोबरच मृत्यूच्या आकड्यांचा चढता आलेख ; मात्र डिस्चार्ज दिलासा...

जावली तालुक्यात कोरोना बरोबरच मृत्यूच्या आकड्यांचा चढता आलेख ; मात्र डिस्चार्ज दिलासा दायक.

सूर्यकांत जोशी कुडाळ दि.२५ – जावली तालुक्यात रविवारी कोरोना बाधितांना आकडा ३१ वर आला होता.त्यानंतर काल ४१ तर आज ५६ वर पोहचला आहे. एप्रिल व मे महिन्यातील आणखी बारा मृत्यूची नोंद आज झाली आहे.तालुक्यातील एकूण कोरोना मृत्यूचा आकडा १९९ झाला आहे.कोरोना बाधित आणि मृत्यूचा वाढणारा आकडा मन हेलावणारा आहे.परंतू त्याच वेळी बाधितांपेक्षा डिस्चार्ज अधिक होत असल्याने अॅक्टिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे.१ मे रोजी तालुक्यात १०२२ अॅक्टिव्ह रुग्ण होते.आता अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४९९ राहिली आहे.

               कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जावली चे प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे.अधिकारी वर्ग शासनाच्या तसेच  जनतेतून येणाऱ्या सूचनांचा गांभीर्याने विचार करुन शक्य तितक्या उपाययोजना करत आहे.होम आयसोलेशन मुळे संसर्ग साखळी तयार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आता शासन आदेशानुसार गावपातळीवर विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.लोकांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देणे अपेक्षित आहे.

                कोरोनाने निर्माण झालेल्या अशा या आणिबाणीच्या प्रसंगावर मात करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्था पुढे येत आहेत.त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला बळ मिळत आहे. गावपातळीवरुन ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य , ग्रामसेवक व कर्मचारी, आरोग्य व  महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच आशा व अंगणवाडी सेविका ,वीज कर्मचारी यांचे योगदान अनमोल आहे.ही सगळी यंत्रणा लोकांचे जीव वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे.त्यामुळे या सांघिक प्रयत्नातून  आपण नक्कीच ही लढाई जिंकणार यात शंका नाही.

           जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२४ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ५६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; सावरी १,वाकी १,बोंडारवाडी १,डांगरेघर २,केळघर ४,केंजळ २,मेढा ३,ओखवडी १,पुनवडी १, रिटकवली ३, वाळंज वाडी ६ पैकी एक मृत्यू दि. १३ मे.,जरेवाडी १, खर्शीबारामुरे १, कुडाळ २,महू १,वहागांव १ मृत्यू दि.१६  मे,दिवदिववाडी २,कुसुंबी २, सह्याद्री नगर १,सायली ४, वागदरे १, आलेवाडी ४,आनेवाडी ३ पैकी एक मृत्यू दि.१२ मे.,भिवडी १ मृत्यू दि.१२ मे, इंदवली ३, प्रभूचीवाडी १, सायगांव ३ एकूण ५६ यामध्ये ४ मृत्यूची नोंद आहे.याशिवाय मागील अन्य ८ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page