Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन

जावली तालुक्यात गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन

सूर्यकांत जोशी कुडाळ – आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांचे जावळी तालुक्यात जल्लोषात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते घरोघरी बाप्पांचे उत्साही वातावरणात मध्ये स्वागत करण्यात आले गणेशोत्सव या सणाच्या निमित्ताने बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या गणेश मूर्तींसोबतच सजावटीचे साहित्य घेण्यासाठी त्याचबरोबर प्रसादासाठी लागणारे पेढे मोदक इत्यादी खरेदी करण्यासाठी भाविकांचे अलोट गर्दी बाजारपेठेत झाली होती.

          आपल्या परंपरा आणि धर्म संस्कृतीनुसार गणरायांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरी आलेल्या बाप्पांचे दारातच ओवाळून औक्षण करण्यात आले त्यानंतर खास सजवलेल्या मकरात बाप्पांना ठेऊन विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून विराजमान करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page