Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात गेल्या सात दिवसांत किती झाले कोरोना बाधित ; अन् किती...

जावली तालुक्यात गेल्या सात दिवसांत किती झाले कोरोना बाधित ; अन् किती झाले कोरोना मुक्त.

जावली तालुक्यात गेल्या सात दिवसांत

१४४जण कोरोना बाधित ;२३४ कोरोनामुक्त

 कुडाळ दि.- जावली तालुक्यात गेल्या सात दिवसांत १४४ जण कोरोना बाधित झाले.तर २३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.तालुक्यात सध्या २२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

          जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२५ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ५२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

          आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे म्हावशी १,असणी ५,केडंबे १,मेढा १, खर्शीबारामुरे १, कुडाळ ६, म्हसवे १,पिंपळी १,आनेवाडी १,नेवेकरवाडी २,रायगांव ३, सोनगाव १२ ,एकूण ३५.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page