Friday, April 3, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात चक्रीवादळाने केली दैना : रेंडीमुरा येथील शाळेचा पत्रा उडाला: सुदैवाने...

जावली तालुक्यात चक्रीवादळाने केली दैना : रेंडीमुरा येथील शाळेचा पत्रा उडाला: सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.


    कुडाळ : शुक्रवार दि.13 मार्च रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अचानक आलेले चक्रीवादळ गावाकडून शाळेच्या दिशेने आले आणि जि.प . शाळेचा पत्रा उडाला . लोखंडी अँगलही वाकले आणि उपसले . पत्रे जवळ जवळ600 ते700 मीटर उंच आकाशात उडाले . काही पत्रे कडयाच्या खाली गेलेत काही पत्रे तिथेच बेंन्ड झालेले आहेत .या मध्ये शाळेच्या इमारतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
       दरे बुद्रूक केंद्राची शिक्षण परिषद असलेने शाळा दुपारी एक वाजता सुटली होती . त्यामुळे मोठा अनर्थ टळला . प्रत्यक्षदर्शी पाहणारे श्री . विष्णू पार्टे  बजरंग पार्टे आणि ग्रामस्थ यांनी सांगितले की आमच्या गावावर आलेले संकट शाळेकडे सरकले अन्यथा खूप मोठे नुकसान व जिवित हानी झाली असती .
     शाळेचे मुख्याध्यापक घटना समजताच तात्काळ शाळेत आले आणि घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली . तसेच गाव कामगार तलाठी व सरपंच दरे बुद्रूक यांनाही या घटनेची माहिती सांगितली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page