
योगेश जेधे यांनी दिलेली आँक्सिजन मशीन कोरोना बाधितांसाठी संजीवनी ठरेल ; शरद पाटील
सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आँक्सिजन मशीनचे लोकार्पण,
सूर्यकांत जोशी कुडाळ – सायगांव तालुक्यातील योगेश उर्फ पप्पू जेधे यांनी त्यांची बहिण कै विद्या अतितकर यांच्या स्मरणार्थ दिलेली आँक्सिजन मशीन कोरोना बाधितांचा जीव वाचवण्यासाठीसंजीवनी ठरेल असे प्रतिपादन तहसीलदार शरदपाटील यांनी केले.
जावली तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निर्माण परिस्थिती वर मात करण्यासाठी प्रशासनाने मदतीसाठी जनतेला आवाहनाला केले होते .त्याला प्रतिसाद देत सायगांव येथील योगेश उर्फ पप्पू जेधे यांनी आँक्सिजन मशीन सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दान दिले.हे मशीन तहसीलदार शरदपाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
तालुक्यात अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर कोरोना बाधितांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकदा मोठ्या रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत अशावेळी तालुक्यात प्राथमिक उपचाराच्या सुविधा करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने ऑक्सीजन मशीन सह विविध आवश्यक उपाययोजनांसाठी मदतीचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी जावलीतील पत्रकार प्रशांत गुजर,पत्रकार धनंजय गोरे, पोलीस पाटिल सुहास भोसलें यांच्या सहकार्याने जावली तालुक्यातील पहिली ऑक्सीजन मशीन जावली तहसीलदार शरद पाटिल,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते,डॉ. मुंढेकर मॅडम तसेच सायगांव प्राथमिक आरोग्य कर्मचारी व सायगांव ग्रामस्थ यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले.