Monday, April 13, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात वारकऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा; भजन मंडळांना साहित्य वाटप.स्व. श्री. छ....

जावली तालुक्यात वारकऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा; भजन मंडळांना साहित्य वाटप.
स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांप्रदायिक ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान


कुडाळ / प्रतिनिधी

जावली तालुक्यातील वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांप्रदायिक ट्रस्ट, जावली-सातारा यांच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान सोहळा व भजन मंडळांना भजन साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता माऊली मंगल कार्यालय, भणंग (ता. जावली) येथे संपन्न होणार असल्याची माहिती मा सभापती हभप सुहास दादा गिरी यांनी दिली.
            या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार असून, जावळी तालुक्यातील विविध भजन मंडळांना आवश्यक भजन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वारकरी परंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांच्या शुभहस्ते होणार आहे,या सोहळ्यास माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, जि.प. सदस्य वसंतराव मानकुंमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  ज्ञानदेवजी रांजणे, पंचायत समिती  सभापती सौरभ बाबा शिंदे, उपसभापती  गोरख दादा महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच  चारुशीला पवार,रूपालीताई वारागडे, जयदीप शिंदे, हेमंतजी शिंदे, विकास देशपांडे, मच्छिंद्रनाथ क्षीरसागर, संदीप परामणे, पांडुरंग वाघ यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तालुक्यातील समस्त वारकरी, शेतकरी, पत्रकार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुहास गिरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सुहासदादा गिरी मित्र समूह, जावली,सातारा, जावली तालुका वारकरी संघ, स्व. श्री. छ. अभयसिंहराजे सांप्रदायिक ट्रस्ट तसेच बाबाराजे मित्र समूह (११ गावे – जवळवाडी ते मोरावळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page