जावली तालुक्यातील आणखी चार गावे कन्टेमेंट झोन मुक्त ; गांजेगाव कन्टेमेंट झोन मध्ये
कुडाळ – गेल्या महिनाभरात जावली तालुक्याचा कोरोना आलेख हिंदोळ्यावर बसला आहे.एकीकडे दिवसेदिवस वाढण्यारी कोरोना रुग्ण संख्या काळजी वाढवत आहे तर त्याच वेळी कोरोना वर यशस्वी मात करुन घरी येणाऱ्यां रुग्णांमुळे दिलासा मिळत आहे.यातूनच तालुक्यातील आज आणखी चार गावे कन्टेमेंट झोन मधून बाहेर आली आहेत.तर गांजे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तालुक्यातील केळघर तर्फ सोळशी – तेटली, आंबेघर तर्फ मेढा, रांजणी व भणंग या गावांत कोरोना संक्रमित रूग्ण आढळले होते.परंतु त्यानंतर निर्धारित दिवसांत अन्य कोरोना संक्रमित रुग्ण या गावात आढळला नसल्याने मा.शरद पाटील सो.तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन जावली व मा. सतीश बुद्धे सो.गटविकास अधिकारी जावली यांच्या अहवाला नुसार सदर चार गावचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी जारी केला आहे.
गेल्या दोन दिवसात तालुक्यात केवळ गांजे येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचा म्रत्यू पश्चात रिपोर्ट पाँसिटीव्ह आल्याने गांजे गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता यागावातील हायरिस्क काँन्टेक्ट मधील लोकांच्या अहवालाकडे जावली करांचे डोळे लागले आहेत.
आता पर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७३ वर पोहचली आहे. तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
यापूर्वी निझरे, वरोशी ,केळघर- नांदगणे सायगांव , मोरघर , सावरी,बेलावडे व आपटी या गावांनी कोरोनाला हद्दपार केल्याने ही गावे कन्टेमेंट झोन मधून बाहेर आली आहेत. आता या मध्ये आज आणखी चार गावांची भर पडल्याने आता एकूण बारागावे कन्टेमेंट मुक्त झाल्याने तालुका पुन्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला लोकांनी नियम पाळून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.