सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे कारण देत कुडाळच्या श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांच्या सह तालुक्यातील ग्रामदैवतांच्या पालखी मिरवणूक सोहळ्यास जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शक सूचने नुसार तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी मनाई आदेश जारी केला आहे.तसेच दि.14 घ्या मध्यरात्री पासून दि. 15 च्या मध्यरात्री पर्यंत पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिराच्या शंभर मीटर परिघात तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश आज दि. 13 रोजी जारी करण्यात आले आहेत. केवळ पाच लोकांनाच एकञ येण्यासाठी परवानगी आहे.त्यामुळे पालखी सोहळा पाच लोकांनाच करता येईल असे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी पडल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.नियम पाळून या पालखी सोहळ्यास परवानगी मिळावी अशी अपेक्षा भाविकांच्या मधून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत वर्षी मंदिरे बंद असल्याने भाविकांना नवराञोत्वात ग्रामदेवता चे दर्शन घेता आले नाही.तसेच वर्षभर कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाही.यावर्षी कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने भाविकांना नवराञोत्वात ग्रामदेवतांचे नियमित दर्शन घेता आले.
ग्रामदैवत हे आपल्या संपूर्ण गावाचे सर्वार्थाने रक्षण करते अशी श्रद्धा आहे.त्यामुळे परंपरे नुसार विजया दशमी दिवशी आपल्या गावच्या सिमेवरून ग्रामदैवतांची पालखी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.याबरोबरच प्रभू रामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा विजयादशमी उत्सव साजरा केला जातो.
नवराञोत्वाला दुर्गादेवी उत्सव असेही संबोधले जाते.काही ठिकाणी दुर्गामातेचे पूजन व उपवास करतात.परंतू बहुतांश प्रमाणात कुलाचार म्हणून आपली कुलदेवता, कुलदैवत, ग्रामदैवत यांची नवराञात उपासना केली जाते.