आज १३८ डिस्चार्ज ; ३९ जण कोरोना पाँझिटीव्ह.
२२२६, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह ६२
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले महिनाभर थोडासा दिलासा देणार्या कोरोना संसर्गाने आक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा डोके वर काढले आहे.कोरोना संसर्गाच्या पुन्हा नवीन साखळ्या तयार होत असून लोकांनी अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे.
गुरुवारी रात्री तब्बल ३९ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये वाळंजवाडी २,कुडाळ ४, शेते १,काटवली २, जवळवाडी १, मेढा २,कुसुंबी १,दुंद १, सांगवी १, बेलोशी १, आगलावेवाडी २०,करंजे मेढा १ यांचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
लाँकडाऊनच्या सवलती मुळे बाजारपेठांतील व्यवहार सुरळीतपणे सुरु होत आहेत. परंतू लोक दिवसेंदिवस कोरोनाच्या अटी विसरत आहेत. तोंडावरचा मास्क गळ्यात लोंबकळत आहे. तर हा मास्क रोजच्या रोज किती लोक धूत असतील हा प्रश्न रामभरोसे आहे. सोशलडिसटेंसिगचे तीन तेरा केव्हाच वाजले आहेत. अशी परिस्थिती दिसून येत आहे।.
कोरोना प्रतिबंधक लस तयार होण्यासाठी अजुनही किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. लस तयार झाल्यावर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ही तितकाच वेळ लागणार आहे. त्यामुळे अजूनही काही महिने काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या रायगांव व मेढा कोविड सेंटर मध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे या कोविड सेंटरची आवश्यक स्वच्छता व डागडुजी होणे आवश्यक आहे. सप्टेंबरच्या कोरोना संसर्गाची तीव्रता ध्यानात ठेवून संभाव्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आवश्यक उपाययोजना आतापासूनच सज्ज ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी .नूतन तहसीलदार पोळ साहेब तसेच जावलीचे सक्षम कोरोना योद्धधा ठरलेले गटविकास अधिकारी सतीश बुद्धे नक्कीच योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे.