
सूर्यकांत जोशी कुडाळ
नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले(महाराज साहेब)यांचे विश्वासू सहकारी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन मा.श्री.सौरभ (बाबा) शिंदे (भारतीय जनता पाटीॅ )यांची जावळी पंचायत समितीच्या गटनेते पदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब तसेच पंचायत समिती सदस्य गोरख महाडीक व सौ.चारूशिलाताई पवार उपस्थित होते.
सौरभ शिंदे यांनी यापूर्वी जावली पंचायत समितीचे उपसभापती पद भूषवले आहे त्यामुळे त्यांना पंचायत समितीच्या कारभाराविषयी विशेष माहिती आहे याबरोबरच गेले पंधरा वर्षे सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण आहे त्याचबरोबर त्यांचा जनतेशी जवळून संपर्क आहे. सौरभबाबा शिंदे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला पंचायत समितीचे सभापती पद मिळण्याच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आहेत.