HomeTop Newsजावलीत आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू ; ३५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह...

जावलीत आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू ; ३५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

एकूण – १८३६, डिस्चार्ज १३९०, बळी ४५ ,अँक्टिव्ह ४०३

सूर्यकांत जोशी कुडाळ –  जावली तालुक्यात आज  निझरे येथील एका कोरोना पाँसिटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.तालुक्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा ४५ झाला आहे. आज सकाळी १७ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.यामध्ये निझरे २,कुसुंबी ६, मोरावळे २, करंदी तर्फ कुडाळ १,भणंग २, मालचौंडी १, एकीव १,ओझरे १,  मोहाट १,यांचा समावेश आहे. तर नुकताच तालुक्यातील १८ जण कोरोना पाँझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये सोमर्डी २,निझरे  3 , कुसुंबी ४,ओझरे ४,केळघर ३, गवडी २,

मोरावले १,यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

        आज कोरोना बाधितांचा आकडा जरी ३५  दिसत असला तरी हे अहवाल दोन दिवसांचे आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितां मध्ये झपाट्याने वाढ होत होती. ती वाढ आता मंदावलेली दिसत आहे. लोकांनी  काळजीपूर्वक आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण केल्यास तालुक्यात कोरोनाला सहज रोखणे शक्य आहे.तालुक्यात सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular