एकूण – १८८०, डिस्चार्ज १६०१, बळी ५२ ,अँक्टिव्ह २२७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज वालुथ येथील ९३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर आज सकाळी २२ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.या मध्ये मोरावळे ११,दुदुस्करवाडी ३,कुडाळ १,बामणोली तर्फ कुडाळ १,वालुथ १,सरताळे २, खामकरवाडी १,मेढा १,आर्डे १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
प्लाजमादान जीवनदान देणार चॅलेंज
सगळं जग आज सोशल मीडिया वर चॅलेंज देण्यात गुंतल्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पण एक अतिशय महत्वाच आणि जीवन वाचवणार आव्हानाकडे मात्र कुणाचंही लक्ष्य नाही. आणि ते आहे प्लाजमा दान करण्याच आव्हान .
ही कहाणी आहे डॉक्टर जितेंद्र पवार यांची. एक कोविड योद्धा म्हणून डॉक्टर कोरोंनाच्या काळात लोकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. पण लोकांची सेवा करत असतानाच त्यांनाही कोरोंनाने गाठले. लोकांची सेवा करत असतानाच एक दिवस डॉक्टरांचाही कोरोंना अहवाल पॉजिटिव आला पण एक योद्धा कधीही संकटाना घाबरत नाही. डॉक्टरांनी कोरोंना वर जिद्दीने मात केली. आणि त्यांचं रुग्णसेवेचे व्रत त्यांनी चालू ठेवले.
आज दुपारीच डॉक्टरांना ठाणे येथे एका कोरोंना रुग्णाला A+ve ग्रुपचा प्लाजमा आवश्यक असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी प्लाजमा दान करण्याचा निर्णय घेतला. एक डॉक्टर म्हणून ते नेहमीच प्लाजमा दान करण्याचे संगळ्याना आवाहन करीत असतात. पण आज बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे डॉक्टरानी स्वतच्या कृतीतूनच समाजापुढे आदर्श निर्माण केला. रुग्णसेवेच्या माध्यमातून डॉक्टर समाजासाठी झटत आहेतच. पण प्लाजमा दान करूनही आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो हा महत्वाचा संदेश त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. आणि अश्याही पद्धतीने रुग्णसेवा करता येऊ शकते ही त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो चॅलेंज स्वीकारण्यासाठी सगळेच पुढे येत आहेत पण जीवनदान देण्याचं डॉक्टरांनी स्वीकारलेले हे एक अनोख चॅलेंज आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
डॉक्टरांच्या समाजप्रति असलेल्या या बांधिलकीच्या भावनेला सलाम.
प्रा. विद्याधर चव्हाण सातारा.
