जावलीत आज कोरोना बाधितांना आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर
एकूण ५८७५ बाधित ,४७७१ डिस्चार्ज,१३५ मृत्यू ,९६९ अॅक्टिव्ह
सूर्यकांत जोशी कुडाळ दि.५- जावली तालुक्यात कोरोना बाधितांना आकड्यांचे चढ उतार सुरू आहे.जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.३ व ४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तालुक्यात ९९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ७६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.एप्रिल महिन्यातील आणखी चार मृत्यूची नोंद करण्यात आली असून एकूण मृतांचा आकडा १३५ झाला आहे.
आज प्राप्त अहवालात बामणोली क. १,हात्रेवाडी १,मुनावळे.६ ,फळणी. १ ,बहुले १ ,बिभवी २, केळघर ३, जवळवाडी ५,मेढा. १३,मुकवली ३ , ओझरे. ३,रिटकवली १ , सावली ४ ,वरोशी.७ ,वाळंजवाडी १, बामणोली तर्फे कुडाळ. १,हुमगांव १ , कुडाळ.७ ,शेते. ३,सोमर्डी ३, दिवदिववाडी १,घरातघर १ ,कुसुंबी १ , मोहाट ७ , पैकी दोन मृत्यू दि.२६ व २७ एप्रिल.टेम्बी १,भालेघर.१ ,भिवडी. ८,दरे बु. १ , इंदवली. १,खर्शी त.कुडाळ १,नेवेकरवाडी १,सायगांव. १,सर्जापूर १. एकूण ९९
पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्त संचार वाढवतोय का कोरोना संसर्ग ? क्वारंटाईन काळजी पूर्वक पाळणे आवश्यक
शासनाने जारी केलेल्या लाॅकडाऊनच्या नियमांमुळे कोरोना संसर्ग आता बाहेरून येण्याची शक्यता कमी आहे.परंतू बाधितांच्या आकड्यांतील सातत्य आणि दररोज बाधित होणाऱ्यांचा संपर्क श्रोत पाहता स्थानिक पातळीवरच संसर्ग साखळी तयार होत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने होम आयसोलेट असलेल्या रुग्णांबाबत लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेट होत आहेत.परंतू बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच राजरोसपणे बाहेर फिरत असल्याची लोक चर्चा करत आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वयंशिस्त पाळून आपले कुटुंब, शेजारी व आपल्या गावातील लोकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करणे आवश्यक आहे.स्थानिक पातळीवर वादविवाद राजकारण नको म्हणून कोणी फारसे लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. जावली तालुक्यात अजुनही एक हजाराच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.गेले दोन महिने लाॅकडाऊनच्या चक्रव्यूहात सर्वजण अडकलो आहोत .या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने नियम पाळणे आवश्यक आहे.