Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आज पाच जण कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज पाच जण कोरोना पाँझिटीव्ह ;

 जावलीत आज पाच जण कोरोना पाँझिटीव्ह ;

२१०४, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह १५०

  सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी रात्री पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कुडाळ १, कुसुंबी १, आगलावेवाडी १,  रिटकवली २ यांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

विजयादशमी सण साजरा करताना नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी ; बुद्धे

         रविवारी दसरा सण साजरा होत असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकांनी विषेश काळजी घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे.

       जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  जिल्ह्यात कलम १४४ नुसार मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होईल असे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करणेस प्रतिबंध आहे.दसर्याच्या निमित्ताने सोने म्हणून लुटली जाणारी आपट्याची पाने एकमेकांना देताना सुरक्षित अंतर ठेवावे. गळाभेट घेऊ नये.मास्क वापरावा.बाहेरून आल्यावर साबनाने हात स्वच्छ धुवावेत .शक्यतो घरात थांबूनच हा सण साजरा करुन काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page