जावली तालुक्यात आज पाचजण कोरोना बाधित ; २८ जणांची कोरोनावर मात
एकूण – ६३९, बळी १९, डिस्चार्ज ५१३, अँक्टिव्ह १०७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज अँन्टीजेन कोरोना टेस्ट मध्ये हुमगांव येथील ३ तर भिवडी येथील २ अशा एकूण पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर आज तब्बल २८ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
दरम्यान तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या हायरिस्क क्वान्टँक मधील लोकांच्या स्वाबचे अहवाल आज रात्री दहा वाजे पर्यंत प्राप्त झाले नाहीत.
कोरोनाबाबत काळजी घेऊन गौरी पूजन उत्साहात
आज घरोघर गणपती व गौरींपुढे आकर्षक सजावट करण्यात आली होती.देवाना पुरण पोळीसह विविध मिष्टांनाचा नैवेद्य करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गानेही विशेष काळजी घेऊन मर्यादित घरी हळदी कुंकु समारंभ केला.जरी हळदीकुंकू च्या निमित्ताने सजावट पाहण्यासाठी घरी फारसे कोणी येणार नसले तरीही नेहमी प्रमाणे किंबहुना काही अधिक प्रमाणात सजावट करुन वाँटसप, फेसबुक इत्यादी सोशल मिडियाच्या माध्यमातून फोटो व व्हिडीओ शुटिंग आपल्या सग्यां पर्यंत पोहचवले.
