Saturday, June 13, 2026
HomeTop Newsजावलीत आज बाधितांपेक्षा डिस्चार्ज जास्त असल्याने दिलासा.

जावलीत आज बाधितांपेक्षा डिस्चार्ज जास्त असल्याने दिलासा.

 जावली तालुक्यात कोरोनाचा आकडा सावरतोय.पण सावधगिरी बाळगणे आवश्यक ;

एकूण ; बाधित ६८७३ , डिस्चार्ज ५९०९ , मृत्यू १७९,अॅक्टिव्ह. ७८५.

सूर्यकांत जोशी कुडाळ ; जावली तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सावरताना दिसत आहेत.परंतू काही गावांमध्ये बाधितांचे वाढणारे आकडे पाहता थोडासा बेजबाबदार पणा सुद्धा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरत आहे.स्वयंशिस्त पाळा,मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, नियमांचे पालन करा असाच काहीसा संदेश कोरोना देत आहे.

      जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.१४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व १५ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ६९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १०२ जण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी गेले आहेत.आज मृत्यूची नोंद झाली नाही.तालुक्यात सध्या ७८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

           आजच्या अहवालात नमूद करण्यात आलेले कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; वरसोली १, भणंग १, डांगरेघर ३,केळघर ४,रेंगडी १,तळोशी २,वाळंजवाडी २, बामणोली तर्फे कुडाळ १,दापवडी १,घोटेघर ७, खर्शीबारामुरे ३,कोलेवाडी ३,कुडाळ २, पिंपळी ४,सायघर १,शेते २,सोमर्डी १, वालुथ २,गाळदेव ७,कुसुंबी ५,आनेवाडी ७,दरे बु १, करंदी त.कुडाळ ३,मोरघर २, सायगांव १, सर्जापूर २, एकूण ६९.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page