HomeTop Newsजावलीत कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण ; आज चाळीस डिस्चार्ज ; १४ पाँसिटीव्ह...

जावलीत कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण ; आज चाळीस डिस्चार्ज ; १४ पाँसिटीव्ह ;

एकूण – १८६३, डिस्चार्ज १५९९, बळी ५० ,अँक्टिव्ह २१४

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात सोमवारी सोनगांव येथील एका व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला  असल्याची नोंद झाली आहे. कोरोना बळींचा आकडा ५० वर पोहचला आहे.शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात कोरोना मुळे  होणाऱ्या मृत्यूंची नोंद  तालुक्यात प्रशासनाकडे येण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

         मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात ९ जण बाधित आहेत. यामध्ये दरे बु.१,मेढा १,आंबेघर मेढा १, सरताळे २, ओझरे २, मोरावळे २  यांचा समावेश आहे.तर बुधवारी ४० जण कोरोना मुक्त झाले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

           आता बहुतांश कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण होम आयसोलेट होत आहेत. तर कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांचा अहवाल गोपनीय रहात आहे.गावातील कोरोना बाधित रुग्णाबाबत शेजारच्या लोकांना सुद्धा माहिती मिळत नाही. त्यामुळे होम आयसोलेट एखादा पाँझिटीव्ह रुग्ण बाहेर  समाजात मिसळला तर तो संसर्ग वाढवू शकणार आहे. येणाऱ्या काळात याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे.होम आयसोलेट रुग्णांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपचार घेतले गेले पाहिजेत. परंतु अनेकदा केवळ भिती मुळे आजार अंगावर काढल्याने अनेकांच्या जीवावर बेतलेले आहे.त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

        दरम्यान आज रात्री नुकत्याच आलेल्या अहवालात पाच जण कोरोना पाँसिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular