एकूण -१२७४,डिस्चार्ज ९५८, बळी ३५ , अँक्टिव्ह २८१
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सायगांव येथील ८२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे . तसेच अँन्टीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये मेढा ३, करंदी तर्फ कुडाळ २, कुडाळ २, सरताळे १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.दरम्यान आज स्वाबचे अहवाल अद्याप पर्यंत आलेले नाहीत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी जावलीतअभियानाला प्रतिसाद
जावली तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला जावलीतील जनतेचा प्रतिसाद लाभत आहे. जावली तालुक्यात एकूण २४ हजार कुटुंब संख्या असून ३४ टीम करण्यात आल्या असून प्रत्येक टीम द्वारे दररोज पन्नास कुटुबांना भेटी देऊन सर्व्हे करण्यात येत आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे कोरोना पासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली तर कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
होम आयसोलेशन होणाऱ्या कोरोना बाधितांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक
लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण होम आयसोलेशन होण्यासाठी पसंती देत आहेत. परंतु प्रत्येकाकडे स्वतंत्र राहण्याची सक्षम व्यवस्था असणे आवश्यक आहे.तसेच त्या कुटुबाने सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्ण घरात रहात असला तरीही त्याचे कुटुंबीय बाहेर वावरत असतात.
सुरुवातीला कोरोना बाधित रुग्ण आढळला की पूर्ण गावाला कन्टेंमेंट झोन लावला जात होता. व प्रतिबंधित क्षेत्राचा बँनर लावून ते क्षेत्र सील केले जात होते.आता ती कन्टेंमेंट झोन ची व्याप्ती कोरोना बाधित कुटुंबाच्या घरापुरती मर्यादित होत आली आहे. आणि कोविड प्रतिबंधित क्षेत्राचा बँनर गायब झाला. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे कुटुंब ओळखने दुरापास्त झाले आहे.
सुरुवातीचे नियम व बंधने जवळपास रद्दबातल झाली आहेत वास्तविक हे सर्व निर्बंध लोकांच्या हितासाठी होते.आणि आता हे निर्बंध शासनाने शिथिल केले असले तरीही स्वतःच्या व कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने हे निर्बंध स्वतः वर घालून घेणे आवश्यक आहे.