HomeTop Newsजावली तालुक्यातील सहा गावात कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू - मिनाज मुल्ला

जावली तालुक्यातील सहा गावात कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

जावली तालुक्यातील सहा गावात कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील  कोलेवाडी येथील रांजणवाडी,कुडाळ येथील माळ आळी,आनेवाडी येथील बौद्ध वस्ती,जवळवाडी,मेढा येथील प्रभाग क्र.२ गांथीनगर कातकरी वस्ती नजीक,  तसेच प्रभाग क्र. ५ कातकरी वस्ती नजिक या गावांमध्ये  मध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील सहा गावात कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

जावलीत कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात ; दोन दिवसात ४४ बाधित

एकूण – ६१४, बळी १९, डिस्चार्ज ४५४, अँक्टिव्ह १४१

सूर्यकांत जोशी कुडाळ –  दि.२२.जावली तालुक्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. आज शनिवारी तब्बल २८ कोरोना बाधितांची भर पडली  असून काल शुक्रवारी सोळा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला होता.तर खाजगी लँब मध्ये दोघांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. दोन दिवसात तालुक्यात तब्बल ४४ कोरोना बाधित आढळले असून हे सर्व स्थानिक आहेत.  एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.

             तालुक्यात दररोज स्वाब व अँन्टीजेन टेस्टचे प्रमाण वाढवले त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ दिसत आहे. परंतु त्यामुळे कोरोना बाधितांना वेळीच शोधणे शक्य होत आहे. आता कोरोना बाधित स्थानिक आढळत असल्याने लोकांनी तातडीच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. सोशलडिसटेंसिग व मास्क वापरुन कोरोना पासून स्वतः चे व कुटुंबाचे संरक्षण करावे. सर्दी, ताप खोकला यासह कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. प्रशासन या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये पण काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.

         आज पुणे येथील आय सी एम आर लँब कडुन प्राप्त झालेल्या अहवालात मेढा येथील  ३८  व २० वर्षीय पुरूष,एकूण (२),सरताळे -गणेशवाडी येथील ७८,३५ , महिला , ३७,२४,पुरुष ,५,१० बालिका,  एकूण (६ ),कुडाळ येथील ६५,५०,२६, १५, १५, वर्षीय  महिला, ३ वर्षीय बालिका,८ वर्षीय बालक,एकूण( ७),रिटकवली येथील ११ वर्षीय महिला,४२,२३,२०,३५ वर्षीय पुरूष, एकूण (५) बिभवी येथील ३८,२०,१७, वर्षीय महिला , १५ वर्षीय पुरुष,एकूण (४), अँन्टीजेन टेस्ट मध्ये आज कोलेवाडी येथील ६५,७ ,  वर्षीय पुरूष,११ वर्षीय महिला,एकूण (३)कुसुंबी येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. याबरोबरच काल शुक्रवारी मेढा ,कुडाळ  व सायगांव येथे घेण्यात आलेल्या अँटिजेन टेस्ट मध्ये चौदा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular