Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत ७५ ग्रामपंचायतीसाठी ३७४ अर्ज दाखल ; उद्या अर्ज दाखल करण्याची अंतिम...

जावलीत ७५ ग्रामपंचायतीसाठी ३७४ अर्ज दाखल ; उद्या अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस

बहुतांश ग्रामपंचायतीचा निवडणूका बिनविरोध करण्याकडे कौल
कुडाळ ग्रामपंचायतीसाठी जोरदार रस्सीखेच

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात ७५ ग्रामपंचायतीच्या ५४५ जागांसाठी निवडणुका होत आहेत.यासाठी आज अखेर ३७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींचा निवडणूक बिनविरोध करण्याकडेच कल दिसत आहे. जावली तालुक्यातील सर्वात मोठ्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी आज अखेर तब्बल ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
तालुक्यातील ७५ ग्रामपंचायती पैकी चोरांबे,मामुर्डी, रांजणी, वहागांव, काटवली,नरफदेव,आर्डे,मरडमुरे,व रानगेघर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर बहुतांश ग्रामपंचायती साठी उमेदवार संख्ये पेक्षा कमी अर्ज दाखल आहेत.
कुडाळ ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी आज अखेर ४१ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे याग्रामपंचायतीची निवडणूक बहुरंगी होणार असे स्पष्ट होत आहे. त्यानंतर पवारवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १९ तर सरताळे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
बहुतांश नेत्यांच्या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता
आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगांव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी ५, जिल्हापरिषद सदस्य दिपक पवार यांच्या दरे खूर्दच्या सात जागांसाठी ६, सभापती जयश्री गिरी यांच्या महिगाव च्या सात जागांसाठी ६, उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने अधिक चित्र स्पष्ट होईल.
आँनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन निवडणूक प्रशासनाने आज आँफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. त्याबाबतची मार्गदर्शक अधिसूचना तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ यांनी आज जारी केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page