Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीतील निवडणुकी साठी जोर बैठकांना वेग ; छाननीत १७ अर्ज अवैध

जावलीतील निवडणुकी साठी जोर बैठकांना वेग ; छाननीत १७ अर्ज अवैध

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक गावात गावपातळीवर वैचारिक बैठका सुरु आहेत. तर ज्या ठिकाणी निवडणूका अनिवार्य आहेत अशा गावात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणासाठी विशेषतः रात्रीच्या जोर बैठका सुरु झाल्या आहेत.

             जावली तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण ७१४ अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची गुरुवार दि ३१ रोजी छाननी करण्यात आली यामध्ये ६९७ अर्ज वैध असून १७ अर्ज अवैध ठरले आहेत. अशी माहिती जावली तहसील कार्यालय निवडणूक शाखेतून देण्यात आली आहे.

          अवैध अर्ज ठरलेल्या गावांची नावे व अवैध अर्ज संख्या पुढील प्रमाणे धनकवडी १,डांगरेघर १,म्हाते बु. १,पिंपळी २,दरे बु.१,महामुलकरवाडी १,खर्शी त. कुडाळ १,कारगांव १, वेळे १,करंदी त.कुडाळ १,अंधारी – कास २, रानगेघर १,जरेवाडी १, शेते २, एकूण अवैध अर्ज १७.

           अर्ज माघार घेणेची मुदत दि. ४ जानेवारी असून त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page