Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अनुष्का शेवतेचे  यश

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अनुष्का शेवतेचे  यश

सूर्यकांत जोशी कुडाळ -सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत स्व. खाशाबा  जाधव कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कुडाळ प्राथमिक शाळेच्या अनुष्का आशिष शेवते  हिने 35 किलो वजन गटात  जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकवाला. तसेच  पंचायत समिती  स्तरावर  झालेल्या कुस्ती स्पर्धेत अनुष्का हिने प्रथम क्रमांक मिळवला  होता.

           या यशाबद्दल  अनुष्का हिचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी के आर तोंडरमल, गटविकास अधिकारी आर. डी. काळे, मुख्याध्यापक जयश्री  गायकवाड यांनी अभिनंदन केले. उपशिक्षक संदिपकिर्वे, बन्सीधर राक्षे, मेघा  चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांनी अनुष्का शेवते  हिला मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page