HomeTop Newsतालुक्यातील सहकार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज - नामदार शिवेंद्रराजे भोसले :कुडाळला...

तालुक्यातील सहकार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज – नामदार शिवेंद्रराजे भोसले :कुडाळला स्वर्गीय राजेंद्र शिंदेंच्या पुण्यस्मरणानिमित्त सहकार परिषद संपन्न – मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ – स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काका व स्वर्गीय राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब यांनी जावळी तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकाराची मुहूर्त मेढ रोवली. त्यांनी तालुक्यातील सहकार रूजवला व वाढवलाही, त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील, त्यांच्या पाश्चातही त्यांनी उभारलेल्या सहकारी संस्था त्यांचे वारसदार सैारभ शिंदे यांनी मोठे हिमतीने चालवल्या असून प्रतापगड कारखान्यासह, जावळी सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पतसंस्था, सोसायटी यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील सहकार अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असून तालुक्यातील सहकार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कुडाळ ता.जावली येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दिवंगत राजेंद्र शिंदे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व व कार्यक्रमाचे आयोजक सैारभबाबा शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, अजिंक्यतारा कारखानाचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, जावलीचे सहाय्यक निबंधक सुनील जगताप, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, जावली बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे, किसनवीचे संचालक हिंदुराव तरडे, जिवाजी मोहिते, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदिप परामणे, विलासबाबा जवळ, माजी सभापती सैा. अरुणा शिर्के, चंद्रकांत गावडे, रविंद्र परामणे, तानाजी शिर्के, यांच्यासह जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम, आदी मान्यवर व तालुक्यातील सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार भोसले पुढे म्हणाले, सहकारी कारखाने वाचवण्यासाठी केंद्रसरकारने निश्चित चांगली भूमिका घेतली. यामुळे इन्कम टॅक्सचा विषय मार्गी लागला. आज आपला प्रतापगड कारखाना पुन्हा एकदा उभारी घेत असून कारखाना पूर्व पदावर यायला वेळ लागणार आहे याकरिता जास्तीत जास्त उत्पन्न मार्ग कसे निर्माण करता येईल याचा प्रयत्न करायाला हवा. जावलीतील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कायम बरोबर आहे. जावलीत विकासकामे अधिक गतीने होत असून यापुढेही ती होत राहतील. सैारभ शिंदे यांनी सहकार परिषदेची स्तुत्य संकल्पना राबविली असून त्यांच्या कार्याचे कैातुकही केले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या असून आपण एकसंघपणे भाजप पक्षाच्या पाठीशी रहावे. असे आवाहनही नामदार भोसले यांनी यावेळी केले. कार्यक्रामच्या सूरूवातीस मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महेश बारटक्के यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, गेली साठ वर्षे आमचे कुटुंब सहकारात असून विविध माध्यमातून सर्वाशी जोडले आहे. माझा राजकारणातील प्रवेश हा सुध्दा सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निमित्ताने सहकारातुनच झाला. आज अजिंक्यतारा उद्योग समहूाच्या माध्यमातून प्रतापगड कारखान्याला उभारी मिळाली असून नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. तालुक्यात सहकाराचे जाळे अधिकाधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे, सहकार परिषदेचे हे पहिले पर्व असून दरवर्षी अशी परिषद घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपाध्यक्ष श्री. वसंतराव मानकुमरे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, डॉ. राजेंद्र सरकाळे, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या कार्याचा गैारव करून सहकार परिषदेच्या उपक्रमाचे कैातुक केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ ची घोषणा केली असून त्यानिमित्ताने जावली तालुक्यातील 51 विकास सेवा सोसायट्या, तसेच जावली सहकारी बँक, प्रतापगड सहकारी साखार कारखाना, जावली तालुका खरेदी विक्री संघ, विविध सहकारी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, व सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सर्व सहकारी संस्थांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ठ काम करणाऱ्या संथा व व्यक्तींचा विशेष गैारवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कुडाळ ता.जावली – सहकार परिषदेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना नामदार शिवेंद्रराजे भोसले,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular