
सूर्यकांत जोशी, कुडाळ
जावली तालुक्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात गत काही वर्षांत एक नाव ठळकपणे समोर आले—सौरभबाबा शिंदे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असलेल्या या युवा नेतृत्वाबद्दल वाढदिवसानिमित्त विशेष लेख.
सामाजिक बांधिलकी आणि राजकीय परंपरेतून तयार झालेले नेतृत्व
जावली तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे (काका) यांच्या घराण्यात सौरभ शिंदे यांचा जन्म झाला.
दिवंगत चेअरमन स्व. राजेंद्रजी शिंदे (भैय्यासाहेब) यांच्या छत्र छायेखाली वाढल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे संस्कार बालपणापासूनच मिळाले.
भैय्यासाहेबांच्या अकाली निधनानंतर केवळ 19–20 वर्षांच्या वयात सहकार आणि राजकारणाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
तरुण वयात आलेली ही जबाबदारी त्यांनी धैर्याने आणि चिकाटीने स्वीकारली.
संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करताना मातोश्री सुनेत्राताई शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
पहिल्या काही वर्षांत—
कारखान्यावरील मोठे कर्ज,
उत्पादन बंद,कार्यकर्त्यांतील गैरसमज, राजकीय दबाव,अनुभवाचा अभाव,अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
परंतु ‘बेरजेचे राजकारणच टिकते’ हा धडा आत्मसात करून सौरभबाबांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र जोडले.
युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला.
प्रतापगड कारखान्याला पुनरुज्जीवन देण्याची धडपड
भैय्यासाहेबांच्या निधनानंतर प्रतापगड सहकारी साखर कारखाना अत्यंत अवघड परिस्थितीत होता.
कर्जबाजारीपणा, आर्थिक ताण आणि नैसर्गिक संकटांमुळे कारखाना बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती.
या निर्णायक टप्प्यावर—
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकार्य
यामुळे सौरभबाबांनी कारखान्याला पुन्हा सुरळीत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
कारखान्याला नवजीवन देत सहकाराच्या परंपरेचा दीप त्यांनी प्रज्वलित ठेवला.
शिवेंद्रसिंहराजेंसारख्या दिग्गज नेत्याची साथ – सौरभ बाबांच्या नेतृत्वाला नवी झळाळी
विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर जावली तालुक्याचा समावेश सातारा मतदारसंघात झाला.
यानंतर सौरभ शिंदे यांना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वाची साथ मिळाली.
या सहकार्यामुळे सौरभबाबांच्या नेतृत्वाला नवी राजकीय दृष्टी,संघटन कौशल्य,प्रशासनिक समज,सहकार व्यवस्थापनातील प्रगल्भता मिळण्यास सुरुवात झाली.
अजिंक्यतारा–प्रतापगड समूहातून उभारी
गत दोन वर्षांत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या साथीनं प्रतापगड कारखान्याला नवसंजीवनी मिळाली.
या सहकार्यामुळे जावली तालुक्यात पुन्हा विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. प्रतापगड कारखाना सुरू झाल्याने शेकडो कामगारांच्या हाताला काम मिळाले. परिसरातील उद्योग धंद्यांना चालना मिळाली.
येणाऱ्या काळात प्रतापगड कारखाना स्वबळावर उभा राहील, अशी आशावादी परिस्थिती निर्माण झाली आहे.
युवकांचा आदर्श – अष्टपैलू सामाजिक कार्य
सौरभबाबांनी पंचायत समितीच्या सभापती पदासह विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
अत्यंत कमी वयात—संघटन कौशल्य,तडफदार नेतृत्व
लोकांशी संवाद सहकारातील पारदर्शकता
यामुळे ते युवकांचे आदर्श ठरले आहेत.
आज त्यांच्यामागे उभी असलेली युवकांची भक्कम फळी त्यांच्या नेतृत्वाची साक्ष देते.
भावी राजकीय प्रवासासाठी आशावादी दिशा
नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला आगामी काळात आणखी व्यापक दिशा व संधी मिळणार आहेत.
जावली तालुक्याचा विकास, सहकाराची बळकटी आणि युवकांच्या नेतृत्वाची घडामोड यामागे त्यांचे प्रयत्न निर्णायक ठरतील.
सौरभबाबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या भावी दैदीप्यमान, लोकहितकारी आणि जनसंपर्क वृद्धिंगत करणाऱ्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Trying out abcbet for the first time. Seems like they have a decent selection of games. Hopefully, the winnings will follow! Play now abcbet