

सूर्यकांत जोशी कुडाळ –सन 1995-96 साली मी आमदार असताना जावली आणि महाबळेश्वर तालुक्याच्या संयुक्त बाजार समितीचा शेतकऱ्यांना होणारा लाभ स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जावली महाबळेश्वर बाजार समितीचा मार्ग मोकळा झाला.सुरुवातीच्या काळात बाजार समितीला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु त्या परिस्थितीवरही संचालक मंडळाने मात करत बाजार समितीच्या प्रगतीसाठी आटोकाट प्रयत्न केले. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य व्यापार संकुल होत आहे .बाजार समितीला सभापती जयदीप शिंदे व उपसभापती हेमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळ नव्या दमाचे व नव्या विचाराचे लाभले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जावली महाबळेश्वर बाजार समिती उंच भरारी घेईल असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केले.
कुडाळ तालुका जावली येथे जावली महाबळेश्वर बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व्यापार संकुलाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी माजी आमदार सपकाळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र राजपुरे, संदीप परामणे, रविंद्र परामणे, दत्ता भालेघरे, मालोजीराव शिंदे, ऍड शिवाजीराव मर्ढेकर, हिंदुराव तरडे व मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, विद्यमान संचालक मंडळ बुद्धीवादी आहेत आणि त्यामुळे त्यांनी एक चांगला संकल्प हाती घेतला. म्हणून खऱ्या अर्थाने या नगरीला या तालुक्याला सोबतचे चांगलं व्यापारी कॉम्प्लेक्स या ठिकाणी निर्माण होत आहे.
बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी केले.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रयत्नाने नवीन व्यापारी संकुल साकारत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाजार समितीने वाटचाल केली.नव्या संचालक मंडळाने सातत्याने प्रयत्न करून बाजार समितीचे उत्पन्न तीस लाखावर नेले आहे. अशी माहिती शिंदे यांनी दिली.
स्वागत बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी केले. संचालक बुवासाहेब पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाजार समितीचे सर्व संचालक सभासद व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.