Thursday, February 19, 2026
HomeTop Newsना. शिवेंद्रसिंह राजेंच्या दमदार  नेतृत्वाखाली सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला नवी झळाळी

ना. शिवेंद्रसिंह राजेंच्या दमदार  नेतृत्वाखाली सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला नवी झळाळी

सूर्यकांत जोशी कुडाळ 94 21 21 44 50
           कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या पाठीमागे भाजपा विचारसरणी व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भक्कम पाठबळ   लाभले. त्याचबरोबर  त्यांना घराण्याचा राजकीय वारसा, सहकारी संस्थांचे पाठबळ होते. गेल्या दहा वर्षात सौरभ शिंदे यांनी ज्येष्ठ व युवकांचे संघटने केले. गेले तीन वर्ष प्रतापगड कारखाना सुरू असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये असणाऱ्या समाधानाचा फायदा सौरभ शिंदे यांना झाला.असे असूनही पक्षांतर्गत नाराजी मुळे व विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या राजेंद्र रामचंद्र शिंदे यांच्या बाबत असणारे चांगले जनमत यामुळे  सुरुवातीला कुडाळगण सौरभ शिंदे यांना निवडणूक जिंकण्यासाठी अडचणीचा ठरेल असे चित्र होते. परंतु गावात मध्ये पक्षांतर्गत असणारे गट व असणारी नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले. अखेरच्या टप्प्यात योग्य डावपेच आखत सौरभ शिंदे राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंदे यांना राजकीय शह देण्यात सौरभ शिंदे यशस्वी झाले. या निवडणुकीतील विजयामुळे सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला नवी झळाळी मिळाली आहे. माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या  चारित्र्यसंपन्न निस्पृह राजकीय घराण्याचा वारसा,राजकारणातील प्रगल्भता आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्यासह इतर सहकारी संस्थांचे असणारे पाठबळ यांचा विचार करता सौरभ शिंदे यांना केवळ गट आणि गणाच्या राजकारणावर केंद्रित न राहता त्यांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे संधी निर्माण झाली आहे.


             सौरभ शिंदे यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी असणाऱ्या राजेंद्र शिंदे हे सर्वसामान्य जनतेची असणाऱ्या व्यक्तिगत संबंधाच्या बळावर निवडणूक आपण जिंकू असा आत्मविश्वास बाळगून होते. त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी ज्या ताकतीने पक्ष अथवा पक्ष नेतृत्व  उभे राहणे आवश्यक होते. परंतु काहीसा गाफीलपणा किंवा अति आत्मविश्वास अडचणीचा ठरला.  निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सुरुवातीला राजेंद्र शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक जण प्रत्यक्ष प्रचारापासून दूर राहिले तर काहींना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समजावले तर काहीजण सौरभ शिंदे यांच्या गळाला लागले. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजेंद्र शिंदे एकाकी पडल्याचे चित्र दिसले.विजय हातातून निसटतोय हे स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी केलेले धावाधाव फारशी कामी आली नाही. या निवडणुकीत राजेंद्र शिंदे यांना मिळालेली 3132 मते ही लोकांनी त्यांच्या चांगुलपणाला दिलेली दाद म्हणावी लागेल.
           सायगाव गण हा माजी जिल्हा परिषद सदस्य  दीपक पवारांचा बालेकिल्ला समजला जात होता. या निवडणुकीत सायगाव घरी सर्वसाधारण महिला राखीव होता. या निवडणुकीत दीपक पवार यांनी राजकीय परिस्थिती पाहता आपल्या घरातील उमेदवार देणे टाळण्याचे बोलले जाते परंतु दीपक पवार हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला संधी देण्याच्या उद्देशाने आपण साक्षी देशमुख यांना उमेदवारी दिल्याचे सांगत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या वादळात दीपक पवार यांच्या उमेदवाराला भाजपच्या चारुशीला पवार यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हे दीपक पवार यांना राजकीय शह देणारे आहे.
                नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ गटात भाजपची भक्कम ताकद आहे. निवडणूक पूर्व विरोधकांची वैचारिक पातळी पाहता भाजपा विरोधी पक्षांनी ही निवडणूक सोडून दिल्यातच जमा होती. निवडणूक लागल्यानंतर ऐनवेळी उमेदवारांची शोधा शोध आणि ऐनवेळेच्या शिकस्तीवर उमेदवार उभे करण्याचे वेळ विरोधकांना आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर कुडाळ गट भाजपाने निर्विवाद काबीज केला आहे आता आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुका जवळ आले आहेत त्यामुळे या विजयाने हुरळून न जाता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाचे कमळ फुलवण्याची जबाबदारी विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यावर येऊन ठेपले आहे.

           

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page