
सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नाने कुडाळ मध्ये विकास कामांचा धडाका सुरू असून विविध विकास कामांसाठी सुमारे 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. कुडाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला 50 लाख, बोल रे वस्ती संरक्षक भिंत दहा लाख, वारागडे आळी रस्ता काँक्रिटीकरण दहा लाख, कुडाळ बाजारपेठ बस स्टॅन्ड पाठीमागील रस्ता डांबरीकरण पाच लाख, शिक्षक कॉलनी रस्ता पाच लाख असा 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.कुडाळ गावचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.याशिवाय अन्य विविध विकासकामांसाठी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.