Monday, April 6, 2026
HomeTop Newsपाचवड बसस्थानकात एसटीवाहनतळाची व स्वच्छता ग्रृहाची दयनीय अवस्था

पाचवड बसस्थानकात एसटीवाहनतळाची व स्वच्छता ग्रृहाची दयनीय अवस्था

सूर्यकांत जोशी कुडाळ – वाई व जावळी तालुक्याचे महामार्गावरील जंग्शन स्टेशन असलेल्या पाचवड बसस्थानकातील वाहन तळाची व स्वच्छता ग्रृहाची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे एसटी बस चालक व प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सदर एसटीवाहन तळ व स्वच्छता ग्रृहाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

            वाई व जावळी तालुक्यातील प्रवाशांना  सातारा ,सांगली, कोल्हापूर,पुणे, मुंबई, सोलापूर पंढरपूर , वाई महाबळेश्वर अशा चारही दिशांना प्रवास करण्यासाठी पाचवड येथेच एसटीबस मिळवण्यासाठी यावे लागते.याबरोबरच परिसरातील दीडशेहून अधिक गावांना पाचवड हीच मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी प्रवाशांची सतत वर्दळ असते.परंतू प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन अव्याहत धावनार्या एसटीच्या महामंडळाकडुन  पाचवड बस स्थानकाची मात्र सुविधांच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिले आहे.

          चार वर्षांपूर्वी आ.मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून मोडकळीस आलेले पाचवड बसस्थानक इमारत नव्याने बांधण्यात आली.परंतू एसटी वाहन तळ व स्वच्छता ग्रृहाची दुरावस्था कायम राहिली. पावसाळ्यातया परिसराला एखाद्या तलावाचे स्वरूप प्राप्त होते.एसटी चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच पाचवड बसस्थानकात यावे लागते.तर स्वच्छता ग्रृहबंद आहे.

          या बसस्थानक परिसरात डांबरीकरण अथवा काॅंक्रीट करण्यात यावे ,पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात यावी.तसेच स्वच्छता ग्रृहाची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page