Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा अतिवृष्टीग्रस्तांसाठी  मदतीचा हात

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा अतिवृष्टीग्रस्तांसाठी  मदतीचा हात

मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत

सूर्यकांत जोशी कुडाळ : मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटग्रस्त परिस्थितीला हातभार म्हणून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे.कारखान्याच्या वतीने ₹१,००,०००/- (एक लाख रुपये) इतक्या धनादेशाचा सुपूर्दगी समारंभ नुकताच पार पडला. हा धनादेश मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते तहसीलदार कोळेकर साहेब यांच्याकडे देण्यात आला.

         यावेळी कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे आयुष चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर तसेच संचालक उपस्थित होते.

             यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, “संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाप्रती प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने दाखवलेले सामाजिक उत्तरदायित्व अनुकरणीय आहे.”
या उपक्रमामुळे कारखान्याची समाजाभिमुखता अधोरेखित झाली असून पूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page