Homeराजकीयबहुजन आघाडीची फारकत हा तर सुखद...

बहुजन आघाडीची फारकत हा तर सुखद धक्का – सौरभ शिंदे

 कुडाळमध्ये रयत व बहुजन पॅनलच्या आघाडीत  बिघाडी

सूर्यकांत जोशी  कुडाळ – ज्यांच्या चरित्र्यांबाबत गावभर  चर्चा  होते अशा  सदस्यां सोबत  सत्त्तेत रयत पॅनल च्या सदस्यांना बसावे लागत होते हे गावाचे  आणि आमचेही  दुर्दैवच होते. परंतु  सुदैवाने  बहुजन  विकास आघाडीच्या प्रमुखांनी स्वतः होऊन रयत  पॅनलशी  फारकत घेऊन  आम्हाला सुखद  धक्का दिला असल्याची  प्रतिक्रिया पंचायत समितीचे उपासभापती सौरभ  शिंदे  यांनी पत्रकारांशी  बोलताना  दिली.

       आता प्रतापगड साखर  कारखाना सुरु होणार असल्यामुळे लोकांच्चा  उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला मिळत  आहे त्यामुळे यांची  भविष्यात  राजकीय  अडचण होणार असल्याची  भीती त्यांना वाटतं आहे. तसेंच माझ्या सारखे  प्रामाणिक नेतृत्व यांना अडचणीचे  होत असल्याने मला  विरोध  करण्याचा  केविलवाणा प्रयत्न करत  असल्याचे सौरभ  शिंदे   यावेळी म्हणाले.

         दरम्यान बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी केलेल्या आरोपांना रयत पॅनल च्या वतीने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर देण्यात आले आहे.ग्रामपंचायतीत  गावाच्या विकासात्मक कामांच्या बाबतीत आमची सर्वच  सदस्यांना मोकळीक आहे.त्यांच्या सदस्यांना कोण वेठीस  धरतंय  ते त्यांचं त्यांनी पहावं.केवळ बिनबुडाचे  आरोप करू  नयेत  पुरावे द्यावेत.मासिक सभा  अथवा  ग्राम सभेचा  कोणताही ठराव  बदलला  नाही. त्यांच्याच अडमुठे  पणामुळे  विकासकामांना खिळ बसत  आहे असल्याचे  या प्रसिद्ध पत्रकात  नमूद  करण्यात आले आहे.

               गावातील विकास कामांची  निविदा जाहिरात कोणत्या पेपरला  द्यावी या बाबतचा ठरावाला तेच  सूचक  आहेत  . केवळ  यांना कामे मिळत  नाही म्हणून जाणीव पूर्वक रडीचा  डाव खेळून मासिक  सभा  तहकूब  करण्यात  येत आहे. त्यांना आक्षेप होता तर त्यांनी मासिक सभेला  हजर  राहून विरोध केला पाहिजे होता.या पुढे  कोणतेही बिनबुडाचे  आरोप केल्यास सडेतोड  उत्तर देण्यात येईल. 

          आघाडी  करताना  वाटघाटी  करताना जे ठरले  त्या प्रमाणेच काम. आ. शिंदे  यांच्या शब्दाला  आमचे  पॅनल आजही  बांधील  आहोत. बहुजन  विकास आघाडीतच  दोन मत  प्रवाह आहेत.जी कामे लोकांच्या जीवाशी  निगडित  होती अशी तातडीने पूर्णकरणे  आवश्यक  होती अशी पाणी पुरवठा  योजनेची  कामे सर्व सहमतीने  केली.असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद  करण्यात आले आहे.

            माजी सरपंचनी गोसावी वस्तीतील बोअर ला विरोध केला तेच  आज ग्रामपंचायत ची  मोटार व लाईट वापरून स्वतः च्या घरी  पाणी नेहत  आहेत. सणसणाटी आरोप मालोजीराव शिंदे  यांनी यावेळी केला.यावेळी बहुजन आघाडीच्या सदस्यांच्या चरित्र्या बाबत जोरदार टीका केली

             गेल्या दीड वर्षात ग्रामपंचायत चे  कामकाज सर्व सहमतीने  सुरु होते. परंतु  केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी जाणीव पूर्वक विकास कामात अडथळा  आणण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीने  पाठिंबा काढला तरीही  कोणताही  धक्का रयत  पॅनलाला नाही. उलट यांना पाठमागेच  बाजूला करणे  आवश्यक होते अशी  प्रतिक्रिया रयत पॅनल  प्रमुख  राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली.

          सत्तेतून बाहेर पडतो  नुसते  म्हणतात. कुठेही राजीनामा अथवा  पाठिंबा काढल्याचे  कोणतेही  पत्र नाही. यापुढेही रयत  पॅनल गावच्या विकासासाठी प्राधान्य देणार आहे.या निवडणुकीत  लोकांनी सात सदस्य  निवडून  देऊन आमच्यावर  विश्वास दाखवला आहे. पुढील  निवडणुकीत विकासासाठी  आम्हाला पूर्ण ताकदीने  ग्रामस्थ निवडून देतील असा विश्वास शिंदे  यांनी यावेळी व्यक्त केला.

      सरपंच सौ. सुरेखा  कुंभार,रयत  पॅनलचे सदस्य,  उत्तमराव पवार,व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular