Homeराजकीयभैय्यासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था जीवापाड जपणार  - सौरभ  शिंदे

भैय्यासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था जीवापाड जपणार  – सौरभ  शिंदे

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीने प्रतापगड कारखाना परिसर पुन्हा बहारला.

सूर्यकांत जोशी  कुडाळ – कै. लालसिंगराव  शिंदे  काका व भैय्यासाहेब यांनी लोकहितासाठी  सहकारी  संस्था निर्माण केल्या. या संस्था  चांगल्या  चालण्यासाठी  स्वतः चा  प्राण पणाला लावून प्रामाणिक पणे सांभाळल्या. या संस्था म्हणजे काका व भैय्यासाहेब यांचा  आत्मा असून या संस्था मध्येच  आपण  काका व भैय्यासाहेब यांना पहात  आहे. त्यामुळे या संस्था जीवापाड जपत  असून त्या चांगल्या  चालण्यासाठी  सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक साथ  द्यावी असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी  साखर  कारखान्याचे  चेअरमन सौरभ  शिंदे  यांनी केले.

दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने ओसाड पडलेला कारखाना परिसर आज कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीने पुन्हा बहारल्याचे चित्र सुखवणारे होते.

              प्रतापगड  सहकारी  साखर  कारखान्याचे  दिवंगत  चेअरमन  कै.राजेंद्र शिंदे  तथा  भैय्यासाहेब यांच्या 17 व्या पुण्यस्मरण  दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात सौरभ  शिंदे  बोलत  होते.प्रारंभी  कै. लालसिंगराव  शिंदे  सहकारी  पतसंस्थेच्या कारखाना शाखेचे  उदघाटन प्रतापगड कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती  सुनेत्रा शिंदे  यांच्या हस्ते करण्यात  आले.यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना पटसंस्थेच्या  माध्यमातून  पगार  देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या  हस्ते वृक्षारोपण  करण्यात आले.

              त्यानंतर  झालेल्या अभिवादन सभेत बोलताना सौरभ शिंदे  म्हणाले,कै. लालसिंगराव  बापूंसो शिंदे  सहकारी  पतसंस्थेवर 2004-5 साली राजकीय विरोधकांनी निवडणूक  लादली  होती. त्यावेळी भैय्यासाहेब आजारी होते. हॉस्पिटल मधून  उपचार  घेऊन येऊन ते निवडणूक प्रचार  करत  होते. त्यावेळी मी हे सर्व पहिल्यांदा राजकारण जवळून पाहिले आहे. या निवडणुकीच्या  सायगाव  येथेझालेल्या प्रचार सभेत भैय्यासाहेब यांनी मी असेन अथवा  नसेन  पण लोकहितासाठी  या संस्था  वाचायला पाहिजेत असे भावनिक  आवाहन सभासदांना  केले होते. भैय्यासाहेबांचे हे शब्द आपल्या हृदयावर कायमचे  कोरले  गेले आहेत. त्यामुळे यासंस्था  सुरळीत  चालवण्यासाठी  आपल्या सर्वांच्या सहकार्याने  सदैव  प्रयत्न करणार  आहे.

        प्रतापगड कारखाना उभारणी  करताना  कारखान्यात एरंड  गाळणार  का अशी  टीका काहीजण करत  होते. त्यांना किसनवीर  कारखाना बंद पडल्यावर  प्रतापगड चे  महत्व  समजले असेल अशी  टीका सौरभ  शिंदे  यांनी यावेळी केली.** आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य तारा प्रतापगड कारखाना उद्योग समूह पुन्हा उभारी घेईल असा विश्वास सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला.**

           यावेळी रमाकांत  शिंदे, शेतकरी  संघटना  जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले,विश्वासराव बोराटे,बबनराव  चव्हाण,संदीप परामणे, तानाजीराव शिर्के,अजिंक्य  सहकारी  कारखाना कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते,बुवासाहेब पिसाळ,मोहनराव शिंदे,यांनी भैय्यासाहेब यांच्या आठवणीना  उजाळा देणारे मनोगत  व्यक्त केले.प्रास्ताविक व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले. संचालक बाळासाहेब निकम यांनी आभार  मानले, गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular